श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
अजेय अपराजित पराक्रमी योद्धा
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० रोजी सिन्नर जवळ डुबेरे येथे झाला. २ एप्रिल १७२० रोजी छत्रपती शाहुंचे पेशवे बालाजी विश्वनाथ हे सासवड मुक्कामी आकास्मित निधन पावले. छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पहिला बाजीराव यांची १७ एप्रिल १७२० या दिवशी पेशवेपदी नेमणूक केली. त्या वेळी त्यांचे वय अवघे १९ वर्षाचे होते. “पेशवा” याचा अर्थ होता “पंतप्रधान”.
भट घराण्यातील नऊ पेशव्यांपैकी पहिला बाजीराव हा सर्वात प्रभावशाली होता, ज्यांनी मराठा राजवटीचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाच्या आणि युक्तीच्या बळावर मराठा साम्राज्याचा विस्तार केला.त्यांनी पंतप्रधानपद १७२० ते आपल्या मृत्यू पर्येत म्हणजेच १७४० पर्येत संभाळले. २८ एप्रिल १७४० या दिवशी रावेर खेडी, खरगोन जिल्हा , मध्य प्रदेश येथे नर्मदेच्या किनारी या तेजस्वी सूर्याचे निधन झाले. या ठिकाणी त्यांची समाधी आहे.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे महान योद्धा होते. त्यांनी बलाढ्य मुधल सत्तेला नामोहरम केले. निजाम, मोहम्मद बांगश पासून मुघल पोर्तुगालांच्या पर्येत सर्वाना अनेक वेळा पराभूत करणाऱ्या बाजीराव पेशव्यांची त्या काळी महाराष्ट्र, गुजराथ, माळवा, बुंडेलखंड सहित ७० ते ८० टक्के हिंदुस्तानवर निर्विवाद सत्ता होती. बाजीराव पेशव्यानी मुघल सत्तेला दिल्ली पर्येतच सिमित केले होते. बाजीराव पेशवे यांच्या नावाने इंग्रज थर थर कापत होते मुघन शासक तर बाजीराव पेशव्याना एवढे घाबरत होते की त्यांना भेटायलाही ही भीत होते.
श्रीमंत थोरले बाजिराव जगातील एकमेव योद्धा आहेत की ज्यानी आपल्या जीवन काळात लढलेल्या ४१ हुन जास्त लढायां मध्ये एकही लढाईत पराभव स्वीकारला नाही. म्हणून त्याना “अपराजित योद्धा” असेही संबोधतात.
बाजीराव पेशवे यांच्या महत्वपूर्ण स्वाऱ्या
माळवा, बुदेलखंड, गुजरात-डबई, सिद्दी, पालखेड
या पैकी १७२८ मध्ये लढली गेलेली पालखेड स्वारी ही जगप्रसिद्ध आहे. ब्रिटिश फील्ड मार्शल रॉबर्ट मॉन्टगोमेरी यांनी आपल्या “कनसाइज हिस्ट्री ऑफ वॉर फेअर” पुस्तकात नमूद केलेल्या जगातील सर्वोत्तम १० लढायां मध्ये या पालखेड लढाईचा समावेश केला आहे.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी नंतरच्या २० वर्षच्या कारकिर्दीत हिंदुस्थानभर अविश्रांत घोडदौड व स्वाऱ्या करून अटक (पाकिस्तान) ते कटक मराठा साम्राज्य निर्माण केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या “हिंदवी स्वराज्याचे” श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या कुशल नेतृत्व व अदभुत युद्धनीतीच्या बळावर “साम्राज्यात” रूपांतर केले. इंग्रजी इतिहासकारांनी “घोडदळाचा ईश्वरदत्त सेनानी” या शब्दात बाजीराव पेशवे यांना गौरवले होते.
छत्रपती शाहू महाराज म्हणतात - “मला जर बाजीराव आणि १ लाख सैनिक या मध्ये निवड करावी लागली तर मी बाजीरावची निवड करेन”
छत्रसाल बुंदेला...... बुंदेलखंड
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द पाळणारा पेशवा बाजीराव.
सन १६७२च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला त्यांच्या पदरी ठेवावे अशी मनीषा राजा छत्रसाल यांनी महाराजांकडे व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी चाणाक्ष बुद्धीने व दूरदृष्टीने छत्रसालास दुसऱ्यासाठी लढण्या ऐवजी स्वतः स्वराज्य स्थापन करावे सल्ला दिला व छत्रसालाशी अलिखित मैत्री करार केला, त्याला लागणारी शक्यतो सर्व मदत केले. वेळ प्रसंगी मदतीसाठी धावून येऊ असा विश्वास दिला. विशेष म्हणजे हा अलिखित मैत्री करार पुढे पूर्ण विश्वासाने जोपासला गेला – कसे ते पाहू.
सन १७२८ च्या मध्यास मुघल सादर बंगशाने पूर्ण तयारीनिशी बुंदेलखंडावर आक्रमण केले. त्याच्या पुढे छत्रसालाचा टिकाव लागेना. असहाय छत्रसालाला या परिस्थितीत आपल्या मित्रराष्ट्रांची, मराठ्याची आठवण होणे स्वाभाविकच होते. छत्रसालाला बाजीराव पेशव्याच्या पराक्रमाची महती ठाऊक होती.छत्रसालाने बाजीराव पेशव्याना सांकेतिक भाषेत निरोप पाठवला –
जो गती ग्राह गजेंद्रकी, सो गती भई है आज ।
बाजी जात बुंदेलकी, राखो बाजी लाज ।
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द पाळणारा तो एक निष्ठवंत पेशवा होता. क्षणाचीही उसंत न घेता बाजीराव एक कर्तव्य म्हणून तात्काळ छत्रसालाच्या मदतीला धावला. बंगशाच्या सैन्याचा पार धूव्वा उडवला अखेर बंगशाने शरणागती पत्करली व बुंदेलखंडावरचे अरिष्ट टळले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अलिखित कराराचे बाजीरावाने प्राणपणाने पालन केले व आलेल्या अस्मानी संकटातून बुडेलखंडाची सुटका केली.
धन्य ते स्वामी आणि धन्य ती स्वामी भक्ती.
बाजीराव पेशव्याचा जीवनातील अधिक काळ रणांगणात शत्रूशी लढण्यात, घोड्याच्या पाठीवर व मुलूखगिरीतच गेला. शनिवारवाडयात ते फार कमी वेळ राहिले. बाजीराव पेशवे पट्टीचे घोडेस्वार होते . त्याचे शरीर सामर्थ्य जबर होते. घोड्याची नाल te बोटांनी सहज वाकवी. सर रिचर्ड टेम्पलने त्यांच्या बद्दल म्हणले आले की “युद्ध संग्रामात तो सर्वांपुढे ठासून उभा राहत असे. सभोवार बंदुकीच्या गोळ्यांचा मारा होत असताना तो कधी कचरला नाही.”
बाजीराव अजिंक्य सेनानी होता. घोडदळ हे त्यांचे प्रमुख अस्त्र होते व अत्यंत वेगवान हालचाली हे त्यांच्या यशाचे गमक होते. म्हणून इंग्रजी इतिहासकारांनी बाजीरावांना “Heavenly born cavalry leader” अर्थात “घोडदळाचा इश्वरदत्त सेनानी” असे संबोधले होते.
महा पराक्रमी अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
यांच्या बद्दलचे गौरवार्थी उद्गार
“सारे माझेच आहेत. परंतु माणूस असा बाजीराव. मोठाच लौकिक महाराजांचा बाळाजी पंतांनी केला. तदाधिक्य बाजीराव. तलवार बहाद्दर पणाची पराकाष्ठा. असा पुरूषच झालाच नाही.”
“मला जर बाजीराव आणि १ लाख सैनिक या मध्ये निवड करावी लागली तर मी बाजीरावची निवड करेन”
--- छत्रपती शाहू महाराज
Maratha's were at their best in eighteenth century and palkhed campaign of 1727-28. The way Bajirao outgeneraled Nizam-ul-mulk at Palkhed in 1728, is a masterpiece of strategic mobility
--- British Field marshal Bernard Montgomery
Baji rao-I, the great Peshwa, was without doubt the most outstanding statesman and general india produced in the 18th century. He is also considered to be one of the greatest military generals of his time.
-- K.M.Panikkar
“Bajirao I had both, the head to plan and hand to execute”
-- Grand Duff
अशा या महान श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे योध्याचे व एका सच्च्या शिव भक्ताचे लोकांना कायम स्मरण राहावे या साठी पुण्यातील “थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान’ ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) येथे त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन केला आहे व पालखेड,तालुका वैजापुर, छत्रपती संभाजी नगर येथे जगप्रसिद्ध “पालखेड स्वारी” चे स्मारक स्थापन करण्याचे नियोजन करत आहे.
अपराजित पराक्रमी योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना शत शत नमन.
संकलन
श्रीकांत नगरकर, विश्वस्त
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान